नवी दिल्ली: घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. हे नवीन दर आजपासून लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे आता दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडर 1053 रुपयांना मिळणार आहे.
यासोबतच 5 किलोच्या घरगुती सिलिंडरच्या दरातही 18 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच, 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. त्याची किंमत प्रति सिलेंडर 8.50 रुपयांनी कमी झाली आहे.
दरम्यान, नव्या दरांच्या घोषणेनंतर आता राजधानी दिल्लीमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 2,012 रुपये मोजावे लागणार आहे. त्यापूर्वी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 2021 रुपयांवर गेली होती.