Type Here to Get Search Results !

'शिंदे साहेबांनी माजी मुख्यमंत्र्यांना PA म्हणून ठेवले’: 'यांचा' देवेंद्र फडणविसाना टोला!



अकोला : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 'शिंदे साहेबांचे मी मनापासून आभार मानतोय त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना 'पीए' म्हणून ठेवले' असा टोला नाव न घेता मिटकरींनी फडणवीसांना लगावला आहे.



यावेळी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार कायद्याने धरून नाही, असे भाजप नेते त्यावेळी म्हणत होते. आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत यांनीच 'अनलिगल सरकार' स्थापन केले. दोन मंत्र्याच्या मंत्रिमंडळात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् त्यांचे 'ओएचडी' म्हणून देवेंद्र फडणवीस काम पाहत आहे. त्यांनी ठाकरे सरकारच्या निर्णयाला पुनवृत्ती करण्याचे काम केले. 


मिटकरी पुढे म्हणाले की, 'सुप्रीम कोर्टाचा निर्णयपर्यंत हे सरकारच टिकणार की नाही हे माहित नाही. राज्याला अजूनही कृषी मंत्री नाही. शिंदे साहेबांचे मी मनापासून आभार मानतोय त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना 'पीए' म्हणून ठेवलं' असा खोचक  टोलाही मिटकरींनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांना लगावला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies