Type Here to Get Search Results !

कौतुकास्पद! ५ वी पास तरुणाने बनवली गॅसवर चालवणारी बाईक; 1 किलो गॅसमध्ये 100 किमीपर्यंत अंतर पार!



जालौन : उत्तरप्रदेशातील एका तरुणाने पेट्रोल डिझेलला पर्याय म्हणून गॅसवर चालणारी बाईक बनवली आहे.या तरुणाने आपल्या पेट्रोलवर चालणाऱ्या बाईकचे रुपांतर घरगुती गॅसवर चालणाऱ्या बाईकमध्ये केले आहे. दिनेश असे या तरुणाचे नाव आहे.



प्राप्त माहितीनुसार, दिनेशने बनवलेली ही बाईक 1 किलो गॅसमध्ये 100 किमीपर्यंतचे अंतर पार करते. वास्तविक, जालौनच्या कैथवा गावात राहणारा दिनेश दिल्लीत सीएनजी ऑटो रिक्षा चालवायचा. मोठी वाहने गॅसवर धावू शकतात, मग दुचाकी का नाही, असा विचार त्याच्या मनात आला. त्यानंतर दिनेशने याबाबत संशोधन सुरू केले. त्याने घरगुती गॅसवर चालणारी बाईक बनवली. त्यांची ही बाईक 1 रुपयात एक किलोमीटर अंतर कापते. 



दरम्यान, देशात पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत असताना, गॅसवर चालणाऱ्या बाईकची बातमी लोकांना दिलासा देणारी आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies