Type Here to Get Search Results !

संजय राऊतांकडे मुख्यमंत्री शिंदेचे 10 लाख रुपये; ‘यांची’ धक्कादायक प्रतिक्रिया!



मुंबई:  शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या घरातून ईडीने जप्त केलेल्या रोख रक्कमेपैकी दहा लाख रुपयांची रक्कम ही एकनाथ शिंदे यांच्या नावावर असल्याचे आढळून आले आहे.या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांना शिंदे यांच्या विरोधात अयोध्येत जाऊन काही कारवाई करायची असेल म्हणून ती रक्कम असावी असे केसरकर यांनी म्हटले. 



यावेळी दीपक केसरकर म्हणाले,  “एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अयोध्येत काही करायचे असेल म्हणून ते पैसे काढले असावेत. ईडीला या पैशांचा स्रोत दाखवावा लागणार असून राऊत हा स्रोत दाखवतील. तसेच,  महाराष्ट्रातील ईडीने केलेल्या 90 टक्के कारवाया या बिल्डरांविरोधात असून 10 टक्के कारवाया राजकीय नेत्यांविरोधात आहे, असेही केसरकर यांनी वक्तव्य केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies