Type Here to Get Search Results !

जीप आणि टेम्पोची धडक;तीन मुलांसह नऊ ठार, 11 जखमी!



कर्नाटक: कर्नाटक येथील तुमाकुरू जिल्ह्यात झालेल्या दोन वाहनांच्या अपघातात नऊ जण ठार तर अकरा जण जखमी झाले आहेत. ठार झालेल्यांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्गावरील सिरा येथे हा अपघात झाला. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, तुमकुरू जिल्ह्यातील बालेनहल्लीच्या प्रवेशद्वारानजीक जीप आणि टेम्पोची जोरदार धडक झाली. या अपघातात काही जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तसेच, या अपघातात रोजंदारीवर जाणा-या मजूरांचा मृत्यू झाला आहे. ते बंगळुरू येथे निघाले होते. या अपघातात नऊ जण ठार झाले आहेत. तसेच अकरा जण जखमी झाले आहेत.



दरम्यान, या अपघातात मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची मदत केली आहे. तसेच जखमींना 50 हजार रुपयांची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केली आहे. त्याबाबतचे ट्विट मोदींनी केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies