1326 रिक्त पदांवर MBBS पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी: जाणून घ्या अधिक तपशील!नवी दिल्ली:  वैद्यकीय आरोग्य सेवा भरती मंडळाने भरती जारी केली आहे. या भरतीअंतर्गत सिव्हिल असिस्टंट सर्जन आणि इतर पदांवर भरती करण्यात येणार आहे. MBBS पदवी शिक्षण घेतलेले इच्छुक उमेदवार या भरतीअंतर्गत अर्ज करु शकतात. या भरतीअंतर्गत एकूण 1326 रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवार mhsrb.telangana.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करु शकतात. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 15 जुलैपासून सुरु झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट आहे.ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाल्याची तारीख - 15 जुलै 2022

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 ऑगस्ट 2022रिक्त पडे खालीप्रमाणे: 

सिव्हिल असिस्टंट सर्जन : 751 पदं

शिक्षक : 357 पदं

सिव्हिल असिस्टंट सर्जन (जनरल) : 211 पदं

सिव्हिल असिस्टंट सर्जन : 7 पदंशैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे एमबीबीएस (MBBS) पदवी असणं आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अधिसूचना पाहणे सोयीस्कर ठरेल.वयोमर्यादा

या भरतीअंतर्गत अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांचं किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 44 वर्ष असावं.


पगार:

सिव्हिल असिस्टंट सर्जन : 58,850 रुपये ते 1,37,050 रुपये

शिक्षक : 57,700 रुपये ते 1,82,400 रुपये

जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर : 58,850 रुपये ते 1,37,050 रुपये

सिव्हिल असिस्टंट सर्जन : 58,850 रुपये ते 1,37,050 रुपये 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured