Type Here to Get Search Results !

रेल्वे रुळावर डोके ठेऊन 24 वर्षीय युवकाने केली आत्महत्या; मानेवरून रेल्वे गेल्याने डोके धडापासून वेगळे!



परभणी: परभणी जिल्ह्यात मानवतच्या कोल्हावाडी शिवारात रेल्वे रुळावर एका 24 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दीपक वाटुरे असे आत्महत्या केलेल्या मयत युवकाचे नाव आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, दीपक रावसाहेब वाटूरे (वय 24) ही मृत युवक सेलु तालुक्यातील वालुर येथील राहणारा होता. मानवतरोड ते देवलगाव अवचार दरम्यान कोल्हावाडी शिवारात पॅसेंजर आली असताना दीपक हा रेल्वे रुळावर झोपल्याने  या युवकांच्या मानेवरून रेल्वे गेल्याने त्याचे डोके धडापासून वेगळे झाले आहे. 



दरम्यान,  या घटनेनंतर मृत युवकाच्या मृतदेहाचे कोल्हा येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. तसेच आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले  नाही. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढीत तपास सुरू केला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies