आईवर लहाणपणी झाला बलात्कार; लेकाने 27 वर्षानंतर दिला न्याय मिळवून!नवी दिल्ली -एका महिलेवर ती लहान असताना बलात्कार झाला होता. पण आता तब्बल 28 वर्षांनी तिच्या लेकाने तिला न्याय मिळवून दिला आहे. एका मुलाला आपल्याला पालकांनी दत्तक घेतले हे समजले. तेव्हा त्याने त्याच्या जन्माचे रहस्य शोधून काढले. त्याने आपल्या खऱ्या आईचा शोध घेतला. त्याला आईसोबत घडलेल्या प्रकाराची माहिती मिळाली. यानंतर तो आईसाठी लढला आणि तिला न्याय मिळवून दिला आहे. याबद्दल अधिक माहिती अशी कि, 1994 मध्ये ही घटना घडली आहे. त्यावेळी 12 वर्षांची मुलगी तिच्या बहिणीसोबत राहत होती. तिची बहीण एका खासगी शाळेत शिकवत होती. एके दिवशी वस्तीतील नकी हसन उर्फ ब्लेडी ड्रायव्हरने घरात घुसून मुलीवर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी त्याचा दुसरा भाऊ मोहम्मद रझी उर्फ गुड्डू याने तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलगी गरोदर राहिली. तिने एका मुलाला जन्म दिला, तो मुलगा हरदोई येथील एका जोडप्याला दिला गेला. यानंतर  तब्बल 27 वर्षांनंतर मुलाला त्याच्या खऱ्या आई-वडिलांबद्दल जाणून घ्यायचं होतं तेव्हा त्याला वाढवणाऱ्या व्यक्तीने त्याला त्याच्या आईचे नाव सांगितलं. त्यानंतर मुलाने आईला शोधून तिची भेट घेतली. महिलेने त्याला तिच्यासोबत घडलेला भयंकर प्रकार सांगितला. पीडितेने मुलाच्या सांगण्यावरून आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी न्यायालयाची मदत घेतली. 4 मार्च 2021 रोजी महिलेने न्यायालयाच्या आदेशावरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "खूप तपास केल्यानंतर दोन्ही आरोपींबाबत माहिती मिळाली. अनेक पथके तयार करण्यात आली. 48 वर्षीय मोहम्मद रझी हैदराबादमध्ये लपून बसला होता. त्याला अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या आरोपीचे लोकेशन ओडिशामध्ये सापडले आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे." (सौ. लोकमत)

 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured