Type Here to Get Search Results !

टेम्पोची दुचाकीला धडक; 30 वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू!



औरंगाबाद: सिल्लोड तालुक्यातील सिल्लोड कन्नड रोडवर बोरगाव बाजार येथील पूर्णा नदीवरील पुलाजवळ भीषण अपघात झाला आहेत. कन्नडकडून भरधाव येणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकीला धडक दिली. यात समाधान अशोक देवरे वय 30 राहणार जामडी ता. कन्नड या तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, मिरचीने भरलेल्या लोडींग आयशर टेम्पो हा कन्नडच्या दिशेकडून भरधाव वेगाने सिल्लोडकडे जात असतांना समोरुन येत असलेल्या समाधान अशोक देवरे यांच्या दुचाकी गाडीला जोराची धडक दिली.या धडकेत समाधान अशोक देवरे या तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला.



दरम्यान, आयशर टेम्पो चालकाने गाडी रोडवरच उभी करुन तो फरार झाला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies