Type Here to Get Search Results !

आदिवासी समाजाच्या अल्पवयीन मुलीवर 6 जणांनी केला बलात्कार!



कन्नड - तालुक्यातील खेडा आठेगाव येथील आदिवासी समाजाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.



प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील खेडा आठेगाव येथे पीडिता ही शिक्षण सोडून देऊन पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या आई बरोबर मोल मजुरीसाठी जात होती. 13 ऑगस्ट शनिवार रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पीडितेच्या राहत्या घरी किरण साहेबराव गोंडे व अरुण कैलास दरेकर या दोघांनी पीडीतेवर जबरदस्ती केली. याअगोदर  किरण साहेबराव गोंडे (३२), अरुण कैलास दरेकर (३१), श्रीकांत अशोक जाधव (३३), गोविंद नेमीनाथ शेळके(२९), संकेत जगन जाधव (१९) व एक विधी संघर्ष ग्रस्त बालक हे सतत तीची छेड कडून तिच्यावर सतत  बलात्कार करीत होते. 



दरम्यान, पीडितेने शनिवारी घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. पीडितेच्या आईने ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन वरील आरोपी विरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी वरील सर्व आरोपींना अटक केली यात एक जण अल्पवयीन आरोपी आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies