Type Here to Get Search Results !

70 वर्षीय आजोबानेच 7 वर्षीय चिमुरड्या नातीवर केला लैंगिक अत्याचार!



वर्धा - वर्धेच्या रामनगर परिसरात एका 70 वर्षीय नराधम आजोबाने स्वतःच्या अवघ्या 7 वर्षीय चिमुकल्या नातीवर अत्याचार केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे. याप्रकारणी रामनगर पोलिसांनी आजोबाला अटक केली आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, महिलेच्या पतीचा दोन वर्षांपूर्वी सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. त्यामुळे महिला आणि तिची सात वर्षीय मुलगी रामनगर हद्दीत घर असलेल्या तिच्या आई-वडिलांकडे दीड वर्षांपासून राहत आहे. रात्रीच्या सुमारास सगळे घरी असताना अचानक चिमुरडीच्या आजीचा ओरडण्याचा आवाज आला. चिमुरडीच्या आईने धाव घेतली असता आपल्याच पोटच्या चिमुरडीशी नराधम 70 वर्षीय वडील  त्याच्या खोलीत अनैसर्गिक कृत्य करताना दिसला. 



दरम्यान, महिलेने थेट रामनगर पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ आजोबास अटक केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies