Type Here to Get Search Results !

सर्व मतदारांनी मतदार ओळखपत्रास आधार जोडणी करून घ्यावी : डॉ. राजा दयानिधी


 
सांगली :  घरोघरी भेटी देवून मतदारांकडून छापील नमुना अर्ज क्रमांक 6 ब  द्वारे स्वेच्छेने आधार क्रमांक गोळा करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. दि. 1 ऑगस्ट 2022 रोजी हा कार्यक्रम सुरू झाला आहे. या कार्यक्रमाबाबत जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष, मीडिया, एनजीओ आणि सीएसओ यांनी मतदार ओळखपत्रास आधार जोडणीसाठी सक्रिय सहकार्य करावे तसेच सर्व मतदारांनी आपल्या मतदार ओळखपत्रास आधार जोडणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.


भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन, विधी व न्याय मंत्रालय यांच्याद्वारा निवडणुक कायदा (सुधारणा) अधिनियम, 2021 अन्वये लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मध्ये सुधारणा केल्या आहेत. यामध्ये कलम 23 नुसार मतदार याद्यातील तपशीलाशी जोडण्याकरीता आणि प्रमाणीकरणासाठी मतदाराकडून ऐच्छिकपणे आधारची माहीती संग्रहित करण्याबाबतच्या सुधारणा अंतर्भुत आहेत. आधार क्रमांक मिळवण्याचा उद्देश मतदार यादीतील त्यांच्या नोंदीचे प्रमाणीकरण करणे आणि भविष्यात त्यांना अधिक चांगली निवडणूक सेवा प्रदान करणे हा आहे. त्या आधारे मतदार नोंदणी नियम 1960 मधील नियम 26B मध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. या सुधारणांची अंमलबजावणी दि. 01 ऑगस्ट 2022 पासून लागू झाली आहे. दि. 1 एप्रिल, 2023 पर्यंत किंवा तत्पूर्वी मतदार यादीत असलेली प्रत्येक व्यक्ती त्याचा आधार क्रमांक उपलब्ध करून देऊ शकतो.


लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मधील कलम 23 मधील दुरुस्तीने स्पष्टपणे नमूद केले आहे की, विद्यमान मतदारांकडून आधार संकलनाचा उद्देश मतदारांची ओळख प्रस्थापित करणे आणि मतदार यादीतील नोंदींचे प्रमाणीकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदारसंघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखणे हा आहे. या कार्यक्रमाचा उद्देश कायदेशीर तरतुदीस अनुसरून आहे. तथापि, आधार क्रमांक सादर करणे हे मतदारांच्या वतीने ऐच्छिक आहे असेही आयोगाने स्पष्ट केलेले आहे. मतदार यादीतील विद्यमान मतदारांनी त्यांच्या आधार क्रमांक भरण्यासाठी नमुना अर्ज क्र. 6ब मध्ये अर्ज मतदार नोंदणी अधिकारी / सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे सादर करावयाचा आहे. अर्ज क्रमांक 6ब भारत निवडणुक आयोगाच्या आणि मुख्य निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. तसेच मतदारांना ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र. 6ब ERO Net, GARUDA, NVSP, VHA या माध्यमांवर देखील उपलब्ध असेल.


भारत निवडणुक आयोगाने विकसित केलेल्या पोर्टल / अॅपच्या माध्यमातून मतदार ऑनलाईन पध्दतीने अर्ज क्र. 6ब भरुन आधार क्रमांक नोंदवू शकतो आणि UIDAI कड़े नमुद असलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त OTP द्वारे आधारचे प्रमाणीकरण करु शकतो. तसेच जर मतदारास स्व-प्रमाणीकरण करावयाचे नसल्यास, मतदार त्याचा स्व-प्रमाणीकरणाशिवाय ऑनलाईन पध्दतीने अर्ज क्र. 6ब भरून त्यासोबत योग्य दस्तावेज सदर करू शकतो. जर मतदाराकडे आधार क्रमांक नसेल आणि त्यामुळे त्याचा / तिचा आधार क्रमांक सादर करता येत नसेल तर मतदाराला नमुना अर्ज क्र. 6ब मध्ये नमूद केलेल्या अकरा पर्यायी कागदपत्रांपैकी कोणताही एक दस्तावेज सादर करता येईल.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies