![]() |
फोटो : आटपाडी : येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करताना आदर्श क्रेडीट सोसायटीचे कर्मचारी व पदाधिकारी |
आटपाडी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित शालेय विद्यार्थ्यांना आटपाडी येथील आदर्श को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी च्या वतीने १५ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद शाळा नंबर एक, दोन व तीन येथील ४५० विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी सोसायटीचे चेअरमन प्रकाश दौंडे, व्हा.चेअरमन राजेंद्र लाटणे, संचालक दिपक देशमुख, सागर भागवत, सर्जेराव राक्षे, नितीन सागर, मोहन पारसे, विकास भुते, महादेव डोईफोडे, कैलास सपाटे, सचिव दत्तात्रय स्वामी व संस्थेचे कर्मचारी, पिग्मी एजंट आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रारंभी संस्थेच्या कार्यालयाच्या समोर ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम मेजर प्रवीण रसाळ यांच्या हस्ते संपन्न झाला.
🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन 'माणदेश एक्सप्रेस' Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा