आटपाडी I साध्य फौंडेशनच्या वतीने मोफत करिअर मार्गदर्शन शिबीरधिरज प्रक्षाळे : आटपाडी तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी नंतर काय? या विषयी दिनांक २० रोजी साध्य फौंडेशनच्या वतीने करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.


प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी करिअर खूप महत्वाचे आहे. विद्यार्थी त्यांच्या क्षमतेनुसार त्यांचे करिअर निवडतात. बहुतेक विद्यार्थी परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी परीक्षेच्या तयारीत व्यस्त असतात. काही विद्यार्थी स्वप्नातील नोकरी मिळविण्यासाठी परीक्षेची तयारी करतात. परंतु १० वी नंतर व 12 वी नंतर काय करावे?  हा प्रश्न सर्वांना पडतो. त्यामुळे या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.


या करिअर मार्गदर्शन शिबिरामध्ये आटपाडी तालुक्याचे सुपुत्र व सध्या आयक्त उपआयुक्त मुंबई या पदावर कार्यरत असलेले डॉ. सचिन मोटे हा मार्गदर्शन करणार आहेत. सदरचे शिबीर हे शनिवार दिनांक २० रोजी सकाळी १०.०० वा. आटपाडी येथील जवळे मल्टीपर्पज हॉल या ठिकाणी होणार आहे. शिबिराचे अधिक माहितीसाठी मनोज जाधव ९५७९८९६७०३, ९३०९१६५२४७ व डॉ. रावसाहेब पाटील ९९७५९४८७३७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले असून प्रवेश सर्वांसाठी विनामुल्य आहे. 


🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन 'माणदेश एक्सप्रेस' Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured