Type Here to Get Search Results !

आटपाडी : तडवळे येथील युवकाचा अपघातामध्ये मृत्यू



आटपाडी : दिघंची ता. आटपाडी, जि. सांगली येथील साळसिंगममळा येथे झालेल्या अपघतामध्ये तडवळे येथील युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडीहून दिघंची कडे चारचाकी स्विफ्ट गाडी (MH-14-DT-5746) चालली होती. तर दिघंचीहून आटपाडी कडे दुचाकी (MH-10-CE-5884) निघाली होती. दिघंची येथील साळशिंगमळा येथे दोन्ही गाडीचा अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील युवक वैभव जालिंदर गिड्डे (व.व.२६, रा. तडवळे ता. आटपाडी, जि. सांगली) याचा जागीच मृत्यू झाला. अपघतानंतर चारचाकी वाहन चालकाने भीतीने पलायन केले.

🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन 'माणदेश एक्सप्रेस' Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies