Type Here to Get Search Results !

'या' ठिकाणी गजीनृत्यासह बैलगाडी शर्यतीचा उडणार धुरळा I जंगी कुस्त्यांचे मैदान



अहमद मुल्ला/म्हसवड : माण तालुक्यातील पळसावडे येथील ग्रामदैवत सिध्दनाथाची यात्रा ही शुक्रवार दि. १९ ते रविवार दि. २२ ऑगस्ट होणार आहे. या निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती पळसावडे ग्रामस्थांनी व यात्रा कमिटीनी दिली आहे.


 यात्रेनिमित्त शुक्रवार दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. एक आदत एक बैल भव्य बैलगाडी शर्यत आयोजित करण्यात आली आहे.  शनिवार दि २० ऑगस्ट रोजी दुपारी १२ वा. गजीनृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वा. महाप्रसादाचे आयोजन केले आहे. रविवार दि. २१ रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी श्री सिद्धनाथ देवाचा नैवेद्य चा कार्यक्रम संपन्न होणार आहे. दु. ३ वा. भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. रात्री ९ वा. कोल्हापूर येथील रजनी गोरड यांचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  तरी सिध्दनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांचा भाविकांनी व शौकीनांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांनी व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन 'माणदेश एक्सप्रेस' Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies