Type Here to Get Search Results !

राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातीचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन



सांगली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतरावदादा पाटील यांची नात, स्व. खासदार प्रकाशबापू पाटील यांच्या कन्या व माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या भगिनी, वैद्यकीय अधिकारी डॉ. मधूताई पाटील यांचे पुणे येथे हृदयविकाराच्या धक्क्याने दुखःद निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक १३ रोजी पद्माळे (सांगली) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 


माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची त्या नात होत्या. दादांचा त्यांच्यावर जीव होता. त्यांना प्रेमाने चिमुताई म्हणून ओळखले जात होते. लहानपणी त्यांच्यावर दोन वेळा हृदय शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्यानंतर आणखी एकदा त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 


सांगलीत नांद्रे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी सामान्य नागरिकांसाठी काम केले होते. त्या सध्या पुणे येथे आरोग्य उपसंचालक कार्यालयात सेवेत होत्या. कोरोना काळातही त्यांनी मोठ्या हिमतीने रुग्णांना सेवा देऊन कोरोनावर मात करण्यात मदत केली होती.

हे ही वाचा 

आटपाडी : भरवस्तीत असलेल्या सॉ-मिल च्या त्रासाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात : स्वातंत्र्यदिनी करणार नागरिक आंदोलन

शिंदे समर्थक आमदाराचं उद्धव ठाकरेंसंदर्भातील ते ट्विट  व्हायरल I स्पष्टीकरण देताना म्हणाले....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies