Type Here to Get Search Results !

भारताचा पाकिस्तानवर विजय : आशिया चषक कपदुबई : आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात चांगलीच लढत होत आहे. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला भारताचा हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवीत पाकला १४७ धावावर रोखले. भारताने ५ विकेट राखत सामना जिंकला.


सलामीला आल्यानंतर मोहम्मद रिझवान आणि बाबर ही जोडीला चांगली कामगिरी करता आली नाही. तिसऱ्या षटकात बाबर आझम (१०) झेलबाद झाला. त्यानंतर संघाच्या ४२ धावा झालेल्या असताना दुसऱ्या विकेटसाठी आलेला फकर झमन (१०) आवेश खानच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर इफ्तिखार अहमद आणि मोहम्मद रिझवान या जोडीने पाकिस्तानी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र अहमद २८ धावा करून हार्दिक पंड्याच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानतर मोहम्मद रिझवानने मोठी खेळी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ४३ धावांवर असताना हार्दिक पंड्याने त्याला बाद केलं. त्यानंतर मात्र पाकचा एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही.


भारताकडून भुवनेश्वरकुमारने चांगली गोलंदाजी करत चार षटकात २६ धावा देत चार बळी मिळवले. तर हार्दिक पंड्याने चार षटकात २५ धावा देत तीन बळी मिळवले. अर्शदीपसिंग ने दोन तर आवेश खानला एक विकेट मिळाली. विशेष म्हणजे भारताच्या फिरकी गोलंदाजांना एकही बळी मिळविता आला नाही.


१४८ धावांचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून कर्णधार रोहित शर्मा व के.एल. राहुल मैदानात उतरले. परंतु, नशीम शहा ने राहुल ला शून्यावर बाद करत भारताच्या गोटात खळबळ माजवली. राहुल बाद झाल्यानंतर विराट कोहली मैदानात आला. परंतु पाकच्या गोलंदाजांनी भारताच्या रोहित व विराट यांना जखडून ठेवल्याने पावरप्लेच्या षटकात भारताला धावा मिळविण्यासाठी मोठा प्रयत्न करण्याच्या नादात कर्णधार रोहित शर्मा नवाज च्या गोलंदाजीवर बाद झाला. पाठोपाठ विराट कोहली ही नवाजच्या फिरकीत जाळ्यात अडकल्याने भारताची स्थिती पुन्हा ५३ वर तीन बाद अशी झाली. सुर्यकुमार यादव ला मोठी खेळी करता आली नाही. तो, १८ धावावर नशीमची शिकार बनला. एका बाजूने रवींद्र जडेजाने किल्ला लढवित ३३ धावा केल्या. हार्दिक पंड्याने शेवटपर्यंत नाबाद राहत १७ चेंडूत ४ चौकार व षटकार मारत सामना भारताला जिंकून दिला. 

🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन 'माणदेश एक्सप्रेस' Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies