Type Here to Get Search Results !

मतदार यादीत नाव नोंदणी करा : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी


मतदार यादीत नाव नोंदणी करा : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

माणदेश एक्सप्रेस न्युज

सांगली : जिल्ह्यात 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमातर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे नमुना-6, नमुना-7, नमुना-8 व आधार जोडणीसाठी नमुना- 6 ब चे अर्ज उपलब्ध होतील. दि. 1 जानेवारी 2023 रोजी 18 वर्ष पूर्ण होणारे सर्व नागरीक मतदार यादीत नवीन नाव नोंदणीसाठी नमुना 6 मध्ये अर्ज करू शकतील. तरी 1 जानेवारी 2023 रोजी 18 वर्षे पूर्ण होत असलेल्या सर्व नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.


दिनांक 9 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिध्द होणाऱ्या प्रारूप मतदार यादीमधील नावांबाबत आक्षेप नोंदविण्यास अथवा नाव कमी करण्यासाठी नमुना 7 मध्ये अर्ज करता येईल. मतदार यादीमधील मतदारांच्या तपशीलात दुरूस्ती करण्यासाठी , एकाच मतदारसंघात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत झाल्यास, मतदान ओळखपत्र बदलून घेण्यासाठी तसेच दिव्यांग व्यक्तींना चिन्हांकित करणे त्याकरीता नमुना 8 मध्ये अर्ज करता येईल. जिल्ह्यात सर्व तहसिल कार्यालये व 282 सांगली विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हा पुरवठा कार्यालय येथे अशी एकूण 11 व ‍जिल्हाधिकारी कार्यालया येथे मतदार मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. 


तसेच मतदार ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करू शकतात. मतदार नोंदणीसाठी जनजागृतीसाठी जिल्ह्यातील 653 शाळा व महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंडळे, 2239 चुनाव पाठशाळा, 117 मतदार जागरूकता मंचाची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक राजकीय पक्षांनी मतदान केंद्रनिहाय मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ता (Booth Level Agent) यांची नियुक्ती करावी. 1 जानेवारी 2023 रोजी 18 वर्षे पूर्ण होणारे सर्व नागरिकांनी मतदार यादीत आपली नावे नोंदणी करावीत असे आवाहन  जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.


🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन 'माणदेश एक्सप्रेस' Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies