Type Here to Get Search Results !

एस.टी बसस्थानकाचे काम 14 ऑगस्ट पर्यंत चालू करा I अन्यथा, 15 ऑगस्ट रोजी एस.टी. महामंडळाच्या जिल्हाविभाग नियंत्रकांना काळे फासणार I डॉ. महादेव कापसे



म्हसवड/अहमद मुल्ला : येथील बस स्थानकाचे दीर्घकाळ रखडलेले व बंद पडलेले बांधकाम रविवारपर्यंत (१४ ऑगस्ट) सुरू करावे, अन्यथा स्वातंत्र्यदिनी (ता.१५ ऑगस्ट) एसटी महामंडळाच्या  जिल्हा विभाग नियंत्रकांना काळे फासणार असल्याचा इशारा कृष्णा खोरे पाणी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.महादेव कापसे यांनी दिला.


राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभाग नियंत्रकांना त्याबाबतचे निवेदन दिले आहे.  म्हसवड हे डोंगरी, दुर्गम, मागास व कायमस्वरूपी दुष्काळी भागातील सर्वांत मोठे बाजारपेठेचे शहर आहे. परिसरात सुमारे साठ हजार लोकसंख्या असणारे शहर सातारा- सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर आहे. येथे अनेक शाळा, विद्यालये, न्यायालय कामानिमित्त येणाऱ्या नागरिक व विद्यार्थांची संख्या मोठी आहे. शैक्षणिक केंद्र ही आहे. पोलिस ठाणे, महसूल कार्यालय, विविध हॉस्पिटल्स तसेच श्री सिध्दनाथ देवस्थान मंदिरास दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र राज्यांतून हजारो भाविकांची ये-जा दररोज होत असते.


एस.टी. बस स्थानकाचे काम ठेकेदाराने कामसुरू केले. मात्र, कोरोनाच्या साथीचे संकट व लॉकडाउनमुळे काम पुन्हा बंद पडले. ठेकेदाराकडून चार-पाच वर्षे झाले तरी काम अर्धवट स्थितीत ठेवले आहे. यामुळे बसस्थानकाला स्मशानभूमीचे रूप धारण झाले आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांची गैरसोय झाली. म्हसवड बस स्थानक हा शहराचा मानबिंदू असून ऐतिहासिक व वैभवशाली म्हसवड शहराची ओळख निर्माण करणारे व नियमित १२० गाड्यांची ये-जा असलेले बस स्थानकाचे बांधकाम शासनाचे हलगर्जीपणामुळे रखडलेले आहे.


मंजूर ठेकेदाराचे कंत्राट रद्द करावे, अथवा १४ ऑगस्टपूर्वी बस स्थानक इमारतीचे काम चालू करावे, अन्यथा १५ ऑगस्टला सातारा येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कार्यालयात जिल्हाप्रमुख तथा विभाग नियंत्रक सातारा यांना काळे फासणार असल्याचा इशारा   डॉ. महादेव कापसे यांनी दिला. 


म्हसवड शहराला अत्याधुनिक पद्धतीच्या बस स्थानकाची गरज असल्याने महामंडळाने म्हसवडसह तासगाव, शिर्डी येथे जुनी बस स्थानके पाडून त्याच जागी नवीन बस स्थानके बांधण्याचा दहा वर्षांपूर्वी निर्णय घेतला. एकाच वेळी तीनही बस स्थानकांच्या निविदा निघाल्या. त्यातील शिर्डी व तासगाव बस स्थानके बांधली गेली. मात्र, म्हसवडचे बांधकाम ठेकेदार कोण असावा? या हेव्यादाव्यांतच रेंगाळले. दोन वेळा भूमिपूजनाचा कार्यक्रमही केला गेला. परंतु अद्याप काम पूर्ण नाही.

हे ही वाचा 

राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातीचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन 

शिंदे समर्थक आमदाराचं उद्धव ठाकरेंसंदर्भातील ते ट्विट  व्हायरल I स्पष्टीकरण देताना म्हणाले....

आटपाडी : भरवस्तीत असलेल्या सॉ-मिल च्या त्रासाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात : स्वातंत्र्यदिनी करणार नागरिक आंदोलन

🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन 'माणदेश एक्सप्रेस' Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies