Type Here to Get Search Results !

शिक्षणप्रेमींकडून वलवणच्या मॉडेल स्कूलसाठी मदत I स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपमनोज कांबळे/ खरसुंडी : वलवण (ता.आटपाडी) येथे १५ ऑगस्ट रोजी "स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव" निमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ध्वजारोहन शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रामभाऊ जाधव यांच्याहस्ते करण्यात आले. सरपंच दगडू गेजगे, मॉडेल स्कूल समितीचे अध्यक्ष, उपसरपंच मारुती जाधव, आबासो जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन जाधव, सदस्य मानसिंग भिसे प्रमुख उपस्थित होते.


वलवण येथील अरुण जाधव यांनी मॉडेल स्कूलसाठी प्रिंटर-झेरॉक्स साहित्य दिले. शिक्षकांकडून स्मार्ट टिव्ही आणि साऊंड सिस्टीम देण्यात आले. अग्रणी सोशल फाउंडेशन संस्थेकडून विद्यार्थ्यांना वह्यांचे करण्यात आले. मॉडेल स्कूलसाठी वलवण येथील ग्रामस्थ तसेच सामाजिक संस्थांकडून मदत होत आहे.


कार्यक्रमाप्रसंगी पोलीस पाटील सुहास शिंदे, ग्रामसेवक पांढरे, अग्रणी संस्थेचे उपाध्यक्ष मनोज कांबळे, आनंदराव जाधव, रोहित भिसे, सदाकाका पाटील, निकेश भिसे, रणधीर गुरव यांच्यासह प्रतिष्ठीत नागरिक, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्याध्यापक धनाजी देठे यांनी मॉडेल स्कूलसाठी मदत करणाऱ्या देणगीदारांचे आभार मानले.


🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन 'माणदेश एक्सप्रेस' Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies