![]() |
आटपाडी : येथील विठ्ठलनगर जि.प. शाळेमध्ये शिक्षक-पालक सभेस उपस्थित पालक |
आटपाडी : आटपाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठल नगर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम व शिक्षक-पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते.
हे ही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आमदार अनिल बाबर व कुटुंबियांचे सांत्वन
सदरची शिक्षक-पालक सभा शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष, विष्णू जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत व मुख्याध्यापिका, सुजाता जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर सभेमध्ये शिक्षिका राजश्री काळे व सुरेखा मंडले यांनी विद्यार्थ्यांच्या शालेय समस्या व इतर विविध विषयावर मार्गदर्शन केले.
या सभेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप करणे, गणवेश वाटप करणे, नियमितपने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे, घरी दैनंदिन अभ्यासक्रम करून घेणे, लोक वर्गणीतून विद्यार्थ्यांच्यासाठी शौचालय बांधणे, 15 ऑगस्ट, रोजी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करणे, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी, तसेच पुढील महिन्यात स्थापन करण्यात येणाऱ्या शालेय शिक्षण समितीची निवड, इत्यादी विषयावर विचार विनिमय करून निर्णय घेण्यात आले.
यावेळी लोकवर्गणीतून विद्यार्थ्यांच्यासाठी शौचालयाचे बांधकाम करण्यात येणार असून, त्यासाठी पालकांकडून मदत करण्याचे आव्हान करण्यात आले, तेव्हा पिसेवाडी गावचे पालक, कैलास पिसे यांनी शौचालय बांधकामासाठी दोन हजार रुपयाची वर्गणी रोख जमा केली. तसेच प्रशांत पाटील यांनी शौचालय बांधकामासाठी लागणारे सिमेंट, वाळू व दरवाजे देण्याचे आश्वासन दिले.
हे ही वाचा : राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातीचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
यावेळी सर्व पालकांनी ही आप-आपल्यापरीने आर्थिक मदत करून विद्यार्थी व विद्यार्थिनींच्यासाठी शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्याचे ठरले. पालक-शिक्षक सभेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नागेश चंदनशिवे यांनी तर तर आभार सुरेखा मंडले यांनी मानले. सभेच्या कार्यक्रमास प्रशांत पाटील, नाथा पवार, विष्णू जाधव, कैलास पिसे यांच्यासह पालक वर्ग उपस्थित होते.
🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन 'माणदेश एक्सप्रेस' Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा