Type Here to Get Search Results !

विनायक मेटे I अखेर पर्यंत मराठा आरक्षणासाठी लढत राहिलेला नेता I संपूर्ण राजकीय प्रवासविनायक मेटे, बीड जिल्ह्यातील मधल्या केज तालुक्यातल्या राजेगाव मधल्या सामान्य शेतकऱ्यांचा मुलगा पुढे जाऊन पाच वेळा आमदार होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. तब्बल पाच वेळा त्यांनी विधानपरिषद सदस्य मिळविले होते. विनायक मेटे यांचा राजकीय प्रवास सुरू झाला तो, अखिल भारतीय मराठा महासंघापासून. १९९४ साली ते प्रथम मराठा महासंघाचे सचिव झाले. मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी भूमिका त्यांनी मराठा महासंघाच्या स्थापनेपासून घेतली होती. आरक्षण आणि समाजाचे इतर प्रश्न सोडवण्यासाठी सामाजिक संघटनेबरोबरच राजकीय पक्ष असायला हवेत असं मराठा महासंघाला वाटू लागल्याने ‘नव महाराष्ट्र विकास’ पक्षाची स्थापना करण्यात आली.


सन 1995 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सोबत युती झाली नाही अन ही बाब त्यावेळचे भाजपचे प्रमुख नेते गोपीनाथ मुंडे हेरली अन ‘नव महाराष्ट्र विकास’ पक्षा सोबत युती केली. त्यावेळी राज्यामध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले अन प्रथमच भाजप कडून विनायक मेटे यांच्या गळ्यात विधान परिषदेच्या माध्यमातून आमदारकीची माळ पडली.


राज्यातील शिवसेना-भाजप युतीचे सरकार जावून त्या ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आले. त्यावेळी विनायक मेटे यांनी त्यांना पक्ष राष्ट्रवादी मध्ये विलीनीकरण करून टाकला. त्यावेळी पुन्हा त्यांना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेची आमदारकी बहाल करण्यात आली. 2002  मध्ये त्यांनी शिवसंग्राम संघटनेची स्थापना केली. मराठा समाजाच्या प्रश्नाबाबत त्यांनी या ही संघटनेच्या माध्यमातून राज्यभर दौरे करत मराठा प्रश्नावर आवाज उठविला. राष्ट्रवादी मध्ये ते  अजित पवार आणि आर.आर. आबा यांच्या जवळचे नेते ओळख निर्माण झाली होती. परंतु कालांतराने त्यांचे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बरोबर त्यांचे खटके उडू लागल्याने त्यांनी राष्ट्रवादी ला रामराम ठोकला.


राज्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार जावून पुन्हा भाजप-सेनेचे सरकार आले व 2016 मध्ये भाजपकडून विनायक मेटे यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. त्यानंतर शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर 2020 मध्ये शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी राज्याच्या राजकारणात रस असल्याने स्थानिक राजकारणात कधीच रस घेतला नाही. अशा या मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर काम करणाऱ्या नेत्याचा अखेर दुर्देवी असा अपघाती मृत्यू झाल्याने मराठा समाजाचे फार मोठे नुकसान झाले.

🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन 'माणदेश एक्सप्रेस' Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies