Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, सोमवार १ ऑगस्ट २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:

टीकाकारांकडे दुर्लक्ष करावे.  स्वत:मध्ये जाणीवपूर्वक बदल करावे लागतील. गरजूंना मदत कराल. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. दिवस मनाप्रमाणे घालवावा. 



वृषभ:-

व्यावसायिक अडचण मिटवाल.  मानसिक व्यग्रता जाणवेल. चांगल्या कामाची योजना आखाल. सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. कौटुंबिक सौख्याचा विचार कराल.



मिथुन:-

आर्थिक व्यवहार पूर्ण कराल. अनावश्यक खर्च टाळावा. तुमचे मनोबल वाढीस लागेल. कामाच्या ठिकाणी अनुकूल स्थिती राहील. घरातील ज्येष्ठांचे प्रोत्साहन मिळेल.



कर्क:-

आपलाच हेका खरा कराल.  परिवारातील प्रश्न संवेदनशीलतेने सोडवावेत. कामाची दिवसभर धांदल राहील. कामाचा ताण नियोजनाने कमी करावा. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका.



सिंह:-

कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. दिवसाचा उत्तरार्ध मौजमजेत घालवाल. प्रकाश झोतात याल. पचनाच्या तक्रारी जाणवू शकतात. शक्यतो हलका आहार घ्यावा.



कन्या:-

मित्रमंडळींचे सहकार्य घ्यावे लागेल. कौटुंबिक समस्येतून मार्ग निघेल. विशाल दृष्टीकोन बाळगावा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. संयम ढळू देऊ नका.



तूळ:-

नातेवाईकांची मागणी पुरवाल. स्पर्धेत यश मिळवाल. उत्पन्नाच्या नवीन संधी शोधाल. जोडीदाराचा खोटेपणा नाराजी वाढवू शकतो. आकांततांडव करू नका. 



वृश्चिक:-

आर्थिक प्रश्न सोडवाल. काही प्रश्न गोडीने सोडवावेत. वाहन चालवताना काळजी घ्या. बोलण्यावर ताबा ठेवावा. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल.



धनू:-

वादाच्या मुद्यातून मार्ग काढाल. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. भौतिक सुखात वाढ होईल. रेस, जुगार यातून नफा कमवाल. आज कामातून चांगला लाभ होईल.



मकर:-

घरगुती कामात अधिक वेळ जाईल. व्यवसायातून चांगला लाभ होईल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. लहानांशी मतभेदाची शक्यता. घराबाहेर वावरतांना सावध रहा. 



कुंभ:-

मनाचा तोल सांभाळावा. दिवस काहीसा धावपळीत जाईल. उगाच बंधनात अडकू नका. वैचारिक धोरण बदलून पहावे. योग्य संधीचा लाभ घ्यावा लागेल.



मीन :-

शक्यतो सौम्य प्रतिक्रिया द्या. क्षुल्लक कुरबुरींकडे दुर्लक्ष करा.  व्यवसाय वाढीचा आनंद घ्याल. ज्येष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल. वैवाहिक सौख्याला जास्त प्राधान्य द्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies