कामावरुन घरी जाताना अपघात; हमाल व्यावसायिकाचा मृत्यू!पुणे: पुण्यात 'पीएमपीएमएल'च्या धडकेत एका दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे. शंकर बबन काळे, वय वर्ष 31 असे मयत दुचाकी चालकाचे नाव असून ते हवेली तालुक्यातील जांभळी या गावचे रहिवाशी आहेत. या प्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात PMPM बस चालक कमलाकर शेवाळे वय 29, रा. वाघोली यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी दिली आहे. याबद्दल अधिक माहिती अशी कि, शंकर काळे हे पुण्याहून दुचाकीवरुन आपल्या गावाला जात असताना श्रीकमळादेवी मंदिर (पिकॉक-बे) येथे आले असता त्याचवेळी विरुद्ध दिशेने आगळंबे गावाकडुन मार्केट यार्डकडे PMPML बस येत होती. यावेळी बहुली रस्त्यावरील श्रीकमळादेवी मंदिराजवळ पुण्याच्या बाजूला ५०० मीटर अंतरावर ही घटना घडली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक दादासाहेब पवार पोहचले असता त्यांनी तातडीने काळे यांना रुग्णालयात हलविले दुचाकी बाजूला घेतली.मात्र काळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured