Type Here to Get Search Results !

“तुम्ही हल्ले केले तर माझी पण फौज ...”; शिंदे गटातील आमदाराचे मोठे वक्तव्य!



बुलढाणा:'महाराष्ट्रात तुम्ही आमदारांच्या गाड्यांवर हल्ले करता , त्यांच्या घरावर हल्ले करता. त्यांच्या परिवारावर हल्ले करता, मग काय आता स्वतःच्या परिवाराच्या रक्षणासाठी स्वतःची टीम तयार ठेऊ नये? आत्मरक्षण करणे हा काय गुन्हा आहे? आमदारांनी मार खावा का? आणि आता मी पण जाहीर पणे सांगतो की, समजा कोणी अशा प्रकारे वागणूक करत असेल तर मी पण तयार आहे.



माझ्या गाडीत पण सगळ्या गोष्टी तयार असतात , माझी पण फौज तयार असते. तुम्ही जर अशा प्रकारे हल्ला करणार नाहीत तर प्रतिउत्तर येईल कशाला' असं गायकवाड म्हणाले. तुम्ही एक्शन करू नका आम्ही इकडून रिऍक्शन करणार नाही. तुम्ही जाहीर पणे सांगता की कुणी कार्यकर्त्याने आमदारांची गाडी फोडली तर आम्ही मातोश्री वर त्याच स्वागत करू, ही भाषा वापरत असला तर आमदारांनी काय तयारीत राहणं काय चुकीचं आहे? का असा सवाल त्यांनी उपस्थित करत अजित पवारांच्या टीकेला उत्तर दिले.



दरम्यान, सत्तेत आले म्हणून दादागिरी करता का असा सवाल उपस्थित करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारमधील आमदारांवरती निशाणा साधला होता. याच अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना बुलढान्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies