Type Here to Get Search Results !

शिवसेनेचे आणखी दोन आमदार शिंदे गटात करणार प्रवेश?



मुंबई: राज्यभरातून एकनाथ शिंदे गटाला वाढत चाललेला पाठिंबा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्ष संघटना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आदित्य ठाकरेही सक्रीयपणे राज्यभरात दौरे करताना दिसत आहेत. परंतु अशातच आता शिवसेनेतून आणखी दोन आमदार फुटणार असून, लवकरच ते शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा शिंदे गटातील मंत्र्यांनी केला आहे. 



शिंदे गटाचे आमदार आणि रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी लवकरच शिवसेनेतील आणखी दोन आमदार फुटतील, असा दावा केला आहे. संदीपान भुमरे हे पैठण येथील कार्यक्रमात बोलत होते .



दरम्यान, तसे घडल्यास हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का ठरू शकतो. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies