Type Here to Get Search Results !

१५ वर्षीय मुलीला धमकी देत वारंवार केला बलात्कार!



पुणे - पुणे शहरात गुलटेकडी परिसरातील १५ वर्षांच्या मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.पीडीत मुलीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  १५ वर्षीय शाळकरी मुलगी, तिच्या आई-वडील आणि लहान बहिणीसोबत राहत होती. पीडित मुलीचे आई-वडील दोघेही काम करतात. 19 फेब्रुवारी रोजी पीडित मुलगी तिच्या शाळेत शिवजयंतीनिमित्त आयोजित नाटकात सहभागी झाली होती. त्यादिवशी मुलगी शाळेतून घरी आली होती. त्या वेळी घरात कोणी नसल्याचे पाहून महेश मोरेने मुलीवर अत्याचार केले. या प्रकाराची कोणाला माहिती दिल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. 



दरम्यान, वैद्यकीय तपासणीत मुलीवर बलात्कार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करुन गुन्हा दाखल केला आणि आरोपी महेश मोरेला अटक करण्यात आली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies