Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, सोमवार २२ ऑगस्ट २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!मेष:

आततायीपणे कोणतीही गोष्ट करू नका. कामातील उत्साह वाढीस लागेल. घरातील गोष्टींबाबत अधिक दक्ष राहाल.  लहान-सहान गोष्टींवरून चिडू नका. बौद्धिक कामात अधिक कष्ट पडतील. 


वृषभ:

चर्चेला अधिक महत्त्व द्या. सामाजिक गोष्टींची जाणीव मनात जागृत ठेवायला हवी. धडाडीपणावर संयम ठेवा. जवळचे मित्र भेटतील. कामाच्या ठिकाणी सुलभता लाभेल. 


मिथुन:

व्यापारी वर्गाला लाभ मिळतील. गोड बोलण्यातून छाप पाडाल. कामातून अनपेक्षित लाभ मिळेल. मित्रांशी सुसंवाद ठेवावा. घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन कामाला निघावे. 


कर्क 

व्यापाऱ्यांनी अधिक मेहनत घ्यावी. व्यावसायिक स्तरावरील बदल लक्षात घ्या. कौटुंबिक जबाबदारी लक्षात घ्या. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. कष्ट अधिक वाढू शकतात. 


सिंह:

जोडीदाराची चांगली साथ मिळेल.  आपले मत अधिक स्पष्टपणे मांडाल. वरिष्ठांना नाराज करू नका. त्यांचा दबदबा वाढेल. नवीन प्रयोगाला यश येईल.


कन्या:

महत्त्वाच्या नोंदी ठेवाव्यात. कष्टाला पर्याय नाही. मन काहीसे विचलीत राहील. मनातील इच्छा अधिक तीव्र होईल. झोपेची तक्रार जाणवेल.


तूळ:

अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. नवीन विचार आत्मसात कराल. मित्रांशी पैज लावाल. कलेला अधिक प्रोत्साहन मिळेल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. 


वृश्चिक:

सरकारी कामे पुढे सरकतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. विरोधक शांत राहतील. वक्तव्य विचारपूर्वक करावे. तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल.

 

धनू:

मनापासून जबाबदारी पार पाडाल. जवळचा प्रवास करता येईल. भावंडांची मदत मिळेल. रागाला आवर घालावी लागेल. गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी. 


मकर:

जोडीदाराची योग्य साथ मिळेल. आध्यात्मिक प्रगती कराल. दिवस शांततेत जाईल. विचारांना योग्य गती द्या. उत्साहवर्धक व सकारात्मक दिवस. 


कुंभ:

स्थावरच्या व्यवहारातून लाभ होईल. मनाची चंचलता जाणवेल. हातातील कामात घाई करू नका. भौतिक सुखात वाढ होईल. अचानक लाभाची शक्यता.


मीन:

राजकारणात पडू नका. मानसिक व्यग्रता जाणवेल. प्रेमातील व्यक्तींनी आज सबुरी बाळगावी. व्यावसायिक लाभावर लक्ष केन्द्रित करावे. अनाठायी खर्चाची शक्यता. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies