Type Here to Get Search Results !

जुन्या भांडणातून तरुणाची कोयत्याने वार करत केली हत्या!



पुणे : पुण्यात भगवा चौक शिवनेरी नगर गल्ली क्रमांक १२ या ठिकाणी काल रात्री किरकोळ कारणावरून एका तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी मित्रा-मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरून ही हत्या झाली आहे.  महेश गुजर वय २४ असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, गुजर हा दुचाकीवरून रस्त्याने निघाला होता. त्यावेळी कोंढव्यातील भगवा चौक परिसरात दोघांनी त्याला अडवले. त्यातील एकाने गुजर याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. हल्यात गंभीर जखमी झाल्याने गुजर याचा जागीच मृत्यू झाला.



घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, गुजर याच्या बहिणीची एका तरुणासोबत मैत्री होती. पवार हा त्या तरुणाचा मित्र आहे. गुजर आणि त्या तरुणात या कारणातून अनेकदा भांडणे झाली होती.त्यातूनच हा खून झाला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. तसेच या प्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies