Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, गुरुवार १८ ऑगस्ट २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:

मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल. काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. क्षुल्लक गोष्टींना फार महत्व देऊ नका. मन:स्वाथ्य कायम ठेवून कार्य करावे. आततायीपणे वागून चालणार नाही. 



वृषभ:

चटकन कोणावरही विश्वास ठेऊ नका. सामुदायिक गोष्टीत फार लक्ष घालू नका.खोळंबलेली कामे मार्गी लागतील. जुने ग्रंथ हाताळले जातील. मित्रांकडून अनपेक्षित टोला बसू शकतो. 



मिथुन:

जुन्या मित्रांशी भेटीचा अथवा फोनवरून संपर्क होण्याची शक्यता. आपल्या योजना गुप्त ठेवाल. स्वत:च्या विचारांना स्थिर ठेवा. तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल. जोडीदाराचा सल्ला ऐकावा. 



कर्क:

कार्यक्षेत्रात परिवर्तन घडून येईल. काही गोष्टींची गुप्तता पाळाल.घरातील जबाबदारी पेलताना दमणूक होईल. ज्येष्ठ व्यक्तींचे सहकार्य घ्यावे.  आहारात पथ्ये पाळावीत. 


सिंह:

बौद्धिक चुणूक दाखवाल. दिवस आनंदात जाईल. नवीन कार्याला चालना मिळेल. आपल्याच मतावर ठाम राहाल. तुमच्या शब्दाला मान लाभेल. 



कन्या:

मनातील निराशा दूर करावी. क्षुल्लक अपेक्षाभंगाने खचून जाऊ नका. तुमच्यातील कलेला कौतुकाची थाप मिळेल.घरातील बरीच कामे मार्गी लागतील. जोडीदाराशी सामंजस्याने वागावे. 



तूळ:

हातून चांगले काम होईल. घरामध्ये शांत राहावे. महत्त्वाचे निर्णय गांभीर्याने घ्यावेत. कामाची नवीन जबाबदारी अंगावर पडेल. आपल्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. 



वृश्चिक:

तुमच्या कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. कमिशनच्या कामातून चांगली कमाई कराल. देणी फेडता येतील.  कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. वरिष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. 



धनू:

हातून चांगली कामे होतील. गरज नसेल तर खर्च टाळा. आत्मविश्वास वाढीस लागेल. खाण्यावर नियंत्रण ठेवा. नियोजनाने कामे सुलभ होतील.



मकर:

मुलांबरोबर संवाद साधावा. अतिविचार करू नका. कौटुंबिक गोष्टी सबुरीने घ्याव्यात. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. धार्मिक गोष्टीत मन रमवावे.



कुंभ:

कामाचा जोम वाढेल. प्रेमसंबंध अधिक दृढ करावेत. ध्येयाकडे लक्ष केन्द्रित करावे. भावंडांशी संवाद साधावा. मुलांबरोबर खेळ खेळावेत.



मीन:

कामाचा विस्तार वाढवण्याचे ठरवाल. घरातील वातावरण शांततामय ठेवा. कोणत्याही प्रकारच्या वादात अडकू नका. अधिकार बेताचाच वापरा. बोलताना तोल जाणार नाही याची काळजी घ्या. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies