Type Here to Get Search Results !

औरंगाबादकरांनी शोधला पेट्रोल-डिझेलवर ‘हा’ नवा पर्याय; जाणून घ्या...!औरंगाबाद: पेट्रोल-डिझेलच्या दरामुळे त्रस्त झालेल्या औरंगाबादकरांनी आता पेट्रोल डिझेलवर नवा पर्याय  शोधला आहे. या नव्या पर्यायांमुळे बियर कॅपिटल, टुरिझम कॅपिटल आणि उद्योग नगरी असलेल्या औरंगाबादची नवी ओळख होत आहे.औरंगाबाद शहरात सध्या इलेक्ट्रिक कार आणि मोटार सायकलची धूम आहे. या वर्षात तब्बल २ हजार ३७५ इलेक्ट्रिक वाहन औरंगाबादच्या रस्त्यावर धावत आहे. एकाच वेळी २०० चारचाकी इलेक्ट्रिक गाड्या औरंगाबादकरांनी खरेदी केल्या आहेत.साधारण १ लाख ते दीड लाख ई-स्कूटर्स विकल्या जात आहेत. मागील वर्षभरात १७०० दुचाकी विक्री झाल्या आहेत. तसेच, शहराला प्रदूषणमुक्त करण्यासाठी उद्योजकांनी एकत्र येऊन मोहीम सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणून एका दिवसात शहरात २०० पेक्षा अधिक इलेक्ट्रिक कार खरेदी केल्या होत्या. औरंगाबाद शहरात सुमारे २० ठिकाणी चार्जिंग पॉईंट आहेत.दरम्यान, आता औद्योगिक वसाहतीत व बीड बायपास, सोलापूर- धुळे, औरंगाबाद- जालना, नगर, मुंबई रोडवर ई कारसाठी चार्जिंग पॉईंट वाढविणे आवश्यक आहे. सध्या दुचाकीचे चार्जिंग घरीच केले जाते. पण पेट्रोल डिझेलसाठीला पर्याय देत औरंगाबादकरांनी आपलं शहरच इलेक्ट्रिक व्हेईकल हब करायचं ठरवलं आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies