Type Here to Get Search Results !

पत्नीच्या त्रासाला कंटाळून २५ वर्षीय तरुणाची व्हिडिओ शेअर करत आत्महत्या!



बीड: बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे बायकोच्या त्रासाला कंटाळून २५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आकाश सुरेश मुळे (वय २५) असे मयत तरुणाचे नाव आहे.



प्राप्त माहितीनुसार, आकाश मुळे याने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने आत्महत्या का करतोय ? हे देखील सांगितले.हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर आकाश याने माजलगाव परिसरातील जायकवाडीच्या उजव्या कालव्याच्या ऐगलला, गळफास घेऊन आत्महत्या केली. 



दरम्यान, याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात मृत्यूची आकस्मात नोंद करण्यात आली आहे. तसेच मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या पत्नीवर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies