Type Here to Get Search Results !

आजचे दिनविशेष; जाणून घ्या इतिहासातील महत्वाच्या घटना!आटपाडी:  ऑगस्ट महिन्यातील आजचा दिवस म्हणजेच 27 ऑगस्ट. श्रावण महिना सरत आला आहे. आणि आज अश्वत्थ मारूती पूजन आहे. श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्र्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. अश्वत्थ मारूती पूजन :

श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्र्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे. त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा करणे असे मानले जाते. पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजादेखील केल्या जातात. 


1980 : भारतीय अभिनेत्री नेहा धुपिया यांचा जन्म.

नेहा धुपिया ही भारतीय अभिनेत्री आहे. ही फेमिना मिस इंडियाची 2002 सालची विजेती आहे. अभिनयापूर्वी मॉडेलिंगच्या जगात आपले स्थान निर्माण करणारी अभिनेत्री नेहा धूपिया आज बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. मॉडेलिंग करत असताना नेहाने 2002 मध्ये फेमिना मिस इंडिया युनिव्हर्सचा किताबही जिंकला होता. त्याच वर्षी नेहाने मिस युनिव्हर्स स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केले होते.1962 : अमेरिकन अंतराळ संस्था नासाने शुक्र ग्रहाची तपासणी करण्यासाठी Mariner 2  हे यान प्रक्षेपित केले.

1999 : सोनाली बॅनर्जी या आपली चार वर्षांची मेहनत पूर्ण करून देशातील पहिल्या सागरी अभियंता बनल्या.

1859 : प्रसिद्ध भारतीय उद्योगपती आणि भारतात टाटा स्टील कंपनीचा पाया रचणारे टाटा समुहाचे प्रमुख दोराबजी टाटा यांचा जन्मदिन.

सर दोराबजी जमशेदजी टाटा हे जमशेदजी नौसरवानजी यांचे ज्येष्ठ पुत्र होते. ज्यांचा जन्म 27 ऑगस्ट 1859 रोजी मुंबई येथे झाला. आपल्या कर्तबगार आणि अनुभवी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भारतीय उद्योग आणि व्यापाराचा मोठा अनुभव मिळवला. 

1910 : पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन इतिहासकार, विचारवंत, संशोधक लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार, कार्यक्षम मुलकी अधिकारी, प्रशासक, ‘गॅझेटियर्स’ चे संपादक असे विविधांगी पैलू असलेले व्यक्तिमत्त्व सेतुमाधवराव पगडी यांचा जन्मदिन.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies