Type Here to Get Search Results !

आईनेच स्वत:च्या १४ महिन्याच्या चिमुरडीची केली हत्या!



वास्को : चिखली-वास्को परिसरात पहाटे  आपल्या १४ महिन्यांच्या चिमुरडीचा नाक, तोंड दाबून आईनेच खून केल्याची घटना उघडकीस आली. मुलीच्या हत्येनंतर आईने जुआरी पुलावरून नदीत उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र ‘डीबीएल’ कंपनीच्या कामगारांनी तिला नदीच्या पाण्यातून बाहेर काढून गोमॅकॅात दाखल केले. निमिषा गोणे असे या महिलेचे नाव आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, निमिषा गोणे हिचा काही वर्षापूर्वी साकवाळ येथील निलेश गोणे याच्याशी विवाह झाला होता. निलेश हा जर्मनीत कामाला आहे. निमिषा काही काळापासून आपल्या मुलीसहीत जर्मनी येथे पती सोबत राहत होती. मात्र, एका आठवड्यापूर्वी निमिषा आपल्या १४ महिन्याच्या मुलीसह गोव्यात आल्यानंतर ती चिखली येथील आपल्या वडिलाच्या राहण्यासाठी आली होती. यानंतर शनिवारी (दि.६) पहाटे तिने आपल्या १४ महिन्यांच्या चिमुरडीचा नाक, तोंड दाबून आईनेच खून केला. यानंतर मुलीचा मृतदेह घरातच ठेवून ती शेजाऱ्यांची चारचाकी  घेऊन जुआरी पुलावर गेली. या पुलावरून तिने नदीत उडी मारली. यावेळी पूलावरून कोणीतरी नदीत उडी मारल्याचे तेथे असलेल्या ‘डीबीएल’ कंपनीच्या काही कामगारांना दिसून येताच त्यांनी त्वरित नदीतून तिला बाहेर काढले. त्यानंतर गोमॅकॉत उपचारासाठी पाठवून दिले. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. 



दरम्यान, निमिषा गोणे या महिलेने मुलीची हत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies