Type Here to Get Search Results !

मोठी बातमी: पोलिसांना मिळणार ‘इतक्या’ रुपयांत घर; राज्य सरकारची घोषणा!



मुंबई:  विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांसाठी मोठी घोषणा केली आहे. बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलिसांना 15 लाख रुपयांत घर देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलिसांच्या घरांची फार बिकट स्थिती असल्याचं समोर आलं होतं. हीच बाब लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे.



दरम्यान, विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 'पोलिसांना बीडीडी चाळीत घरं देण्याची आधीची किंमत ही 50 लाख ठरली होती. त्यानंतर ती 25 लाख करण्यात आली. मात्र आता हीच घरे पोलिसांना 15 लाख रुपयांत देण्यात येईल'.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies