Type Here to Get Search Results !

ब्रेकिंग: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन!Breaking : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन : अपघातामध्ये त्यांचा मृत्यू 


मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष माजी आम. विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात होऊन त्यांचे दु:खद निधन झाल्याची घटना घडली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. 


या अपघातामध्ये विनायक मेटेंना गंभीर जखमी अवस्थेत कामोठेतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आल्याची माहिती भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली आहे. विनायक मेटे आपला एक सहकारी आणि बॉडीगार्ड यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला.


विनायक मेटे यांच्या कारला ट्रकने धडक दिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यांची गाडी बीडवरून मुंबईकडे असताना त्यांच्या गाडीला ट्रकने मारल्याने गाडी ट्रकच्या बंपरमध्ये अडकली आणि गाडी काही अंतरापर्यंत फरफटत गेली. सदरचा अपघात हा पाच वाजता झाला. पण मदत पोहोचण्यासाठी एक तासाचा वेळ लागल्याची माहिती त्यांचे सहकारी एकनाथ कदम यांनी ‘एबीपी’शी बोलताना दिली. दिली. तास लागला. मी फोन केला तेव्हा कंट्रोल रूमवरच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने प्रतिसाद दिला नाही. जवळपास ६ तास रुग्णवाहिका आली”, अशी माहिती विनायक मेटेंचा अपघात झाला तेव्हा त्यांच्यासोबत असणारे सहकारी एकनाथ कदम यांनी ‘एबीपी’शी बोलताना दिली.


दरम्यान, एमजीएम रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. कुलदीप सलगोत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक मेटेंचा मृत्यू डोक्याच्या मागच्या बाजूला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे झाल्याची शक्यता आहे. “विनायक मेटेंचा अपघात पहाटे ५ च्या सुमारास रसायनीजवळ अपघात झाला. त्यांना फार गंभीर जखमा झाल्या होत्या. बहुतेक त्यांचे घटनास्थळीच निधन झालं होतं. त्यांना ६ वाजून २० मिनिटांनी आमच्या रुग्णालयात आणलं गेलं. इथे आणल्यानंतर त्यांना लगेच तपासण्यात आलं. त्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यांच्यासोबत गाडीचे चालक आणि बॉडिगार्ड होते. बॉडिगार्डला देखील गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या चालकाची प्रकृती स्थिर आहे”, अशी माहिती सलगोत्रा यांनी दिली. दरम्यान, विनायक मेटे यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन 'माणदेश एक्सप्रेस' Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies