Type Here to Get Search Results !

लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर लैंगिक बलात्कार; व्हिडीओ शुटींग करुन व्हायरल करण्याची धमकी!



औरंगाबाद: औरंगाबादमध्ये महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.तसेच, लैंगिक अत्याचार करतानाचा व्हिडीओ शुटींग करुन तो व्हायरल करण्याची धमकी देत लग्नाला नकार दिल्याचे समोर आले आहे. सय्यद नबी सय्यद लाला वय वर्ष ३५ राहणार जोगेश्वरी आंबेडकरनगर असे पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सय्यदने पीडित महिलेला गुंगीचे औषध देवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.यावेळी त्यांने पीडितेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करतांनाचे व्हीडीओ शुटींग केले. तसेच, ते शुटींग व्हायरल करण्याची धमकी देत लग्न करण्यासही नकार दिला. 


दरम्यान, या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies