Type Here to Get Search Results !

अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी नाही: राज्य महामार्गावर मृतदेह ठेवत आंदोलन!



यवतमाळ : यवतमाळच्या कळंब तालुक्यातील आणि वडगाव जंगल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या किन्हाळा या गावात अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी नाही. यामुळे अंत्यआसंस्कार मोकळ्या जागेवरच करावे लागतात. त्यामुळे, संतप्त् झालेल्या गावकरी राज्यव महामार्गावर येवून आंदोलन केले. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, किन्हांळा गावात स्मशानभुमी नाही. अशात दुलसिंग राठोड ह्या 58 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी नसल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी यवतमाळ- चंद्रपूर राज्य महामार्गावर प्रेत आणुन ठेवत आंदोलन सुरू केले. 



दरम्यान, आंदोलनाची माहिती पोलीसांनी मिळताच घटनास्थळी पोलीस अधिकारी दाखल झाले.त्यानंतर काही वेळाने महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आश्वासन देण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies