Type Here to Get Search Results !

उपोषणाला बसलेल्या दिव्यांग १२ वर्षीय मुलीचा उपोषणादरम्यान मृत्यू!



सोलापूर: सोलापूरमध्ये अपंग निधीसाठी उपोषणाला बसलेल्या गतीमंद आणि दिव्यांग मुलीचा उपोषणादरम्यान मृत्यू झाला आहे. वैष्णवी रामचंद्र कुरुळे असे या उपोषणकर्त्या गतीमंद मुलीचे नाव असून ती १२ वर्षांची होती.



प्राप्त माहितीनुसार, ग्रामपंचायतीच्या निधीपैकी ५ टक्के रक्कम ग्रामपंचायतीकडून अपंगांसाठी खर्ची घालण्याची तरतूद आहे. मात्र चिकर्डे ग्रामपंचायतीने अनेक वर्षापासून हा निधी खर्ची घातला नाही त्याविरोधात हे उपोषण सुरु होते. १८ ऑगस्टपासून निधी मिळावा म्हणून चिकर्डे गावातच उपोषण सुरू करण्यात आले होते. उपोषणाला गावातील दहा ते पंधरा लोक बसले होते. मात्र, दिवसभर उन्हात बसल्यामुळे उपोषणकर्त्यांनी दावा केला आहे. 


दरम्यान,  मृत मुलगी उपोषणाला बसलीच नसल्याचा दावा आता सोलापूर प्रशासनाने केला आहे. या संदर्भात पोलिसांमध्ये अद्याप कोणतीही नोंद झालेली नाही. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies