Type Here to Get Search Results !

सार्वजनिक गणेश मुर्तींची प्राणप्रतिष्ठापना



ठाणे:ते बदलापूर आणि भिवंडी या शहरात १ लाख ४० हजार ३६६ घरगुती गणपती आणि १ हजार ५२ सार्वजनिक गणेशमुर्तींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.


यंदाच्या वर्षी करोनाचा प्रादुर्भाव ओसरला आहे. त्यामुळे सण उत्सवावरील निर्बंध हटले आहे. त्यामुळे यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळही सज्ज झाली आहेत.


ठाणे जिल्ह्यातील ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात म्हणजेच ठाणे आयुक्तालय क्षेत्रात १ लाख ४० हजार ३६६ घरगुती गणेशमुर्तींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर १ हजार ५२ सार्वजनिक गणेश मुर्तींची प्राणप्रतिष्ठापना होणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली. सुरक्षेच्या दृष्टिने पोलीसही सज्ज झाले असून ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies