Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, बुधवार १७ ऑगस्ट २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!मेष:

स्व‍च्छंदी विचार करावेत.महिलांवरील कामाचा ताण वाढू शकतो. मित्र परिवाराची उणीव जाणवेल.मनावर कसलाही ताण घेऊ नका. आरोग्याची नाहक चिंता कराल. वृषभ:

अपचनाचे विकार जाणवू शकतात. जोडीदाराविषयी मनात संभ्रम निर्माण होईल.नवनवीन गोष्टी वाचनात येतील. कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. विवेकाने परिस्थिती हाताळावी. 


मिथुन:

आपला प्रभाव पाडण्यात यशस्वी व्हाल. नवीन विचार प्रेरणा देणारा असेल.  प्रेमातील व्यक्तीसाठी उत्तम दिवस. योग अथवा व्यायाम करण्यात आळस करू नका.  पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका. 


कर्क:

दिवस मध्यम फलदायी राहील.  घरात कटू शब्द वापरू नका. काही कामे लांबणीवर टाकली जाऊ शकतात.  नसते साहस करायला जाऊ नका. शक्यतो घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

 

सिंह:

बौद्धिक थकवा जाणवू शकतो. परिवारातील सदस्यांच्या गरजा समजून घ्या. ध्यानधारणा करावी. संमिश्र घटना जाणवतील. नोकरदार वर्गाला कामाचा ताण जाणवेल. 


कन्या:

लाभाच्या संधीकडे लक्ष ठेवावे. तरुणांनी बेफिकिरीने वागू नये. भौतिक सुखाचा आनंद घ्याल.सामाजिक बांधीलकी जपावी. काही वेळेस सबुरीने वागणे फायद्याचे ठरेल. 


तूळ:

भावंडांशी वादाचे प्रसंग टाळा.कौटुंबिक वातावरण कलुषित होणार नाही याची काळजी घ्या. कामाविषयी एक विशिष्ट धोरण ठरवा. जोडीदाराकडून अपेक्षा राहतील. इतरांवर विसंबून राहू नका. 


वृश्चिक:

एकांत हवाहवासा वाटेल. मनात एक अनामिक भीती राहील. कामाच्या ठिकाणी अधिकाराने वागाल.परंतु फार काळजी करण्याचे कारण नाही. दुपारनंतर परिस्थितीत सुधारणा होईल. 


धनू:

मनातील काळजी दूर सारावी लागेल. महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावाल. विरोधक नरमाईने घेतील. इतरांना दोष देण्यापेक्षा स्वत: प्रयत्नशील राहावे. मकर:

तुमच्या कामाची पावती मिळण्यास थोडा काळ लागेल. विचारतील कर्मठपणा बाजूला सारावा लागेल. चिकाटी सोडून चालणार नाही. घरात उगाचच चिडचिड करू नका. कोणाचीही नाराजी पत्करू नका. 


कुंभ:

कौटुंबिक जबाबदारी वाढेल. कामात स्थिरता ठेवावी. समोरील कामे प्राधान्याने करावीत. अधिक उत्साहाने कामे हाताळाल. घरगुती कामात अधिक वेळ जाईल. 


मीन:

ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील राहाल. नकारात्मक विचार टाळावेत. खाण्या-पिण्याच्या सवयी बाबत आग्रही राहाल. वरिष्ठांचे कामात सहकार्य मिळेल. आवडते छंद जोपासावेत. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies