Type Here to Get Search Results !

अकरावीच्या विज्ञान शाखेत प्रवेशासाठी मागितली लाच; मुख्याध्यापकासह चार जणांना अटक!



बुलडाणा : माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बुलढाणा येथील इयत्ता ११ च्या विज्ञान शाखेत प्रवेश देण्याकरिता विद्यार्थ्यांच्या पालकांकडून दहा हजारांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापकासह चार जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने असून या चौघांना अटक करण्यात आली आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, विद्यालयामध्ये तक्रारदाराच्या मुलाला अकरावीत प्रवेश देण्यासाठी मुख्याध्यापक प्रल्हाद गायकवाड यांच्या वतीने वस्तीगृह कार्यवाहक गजानन मोरे याने पंधरा हजाराच्या लाचेची मागणी केली. आरोपी जितेंद्र प्रल्हाद हिवाळे याने तक्रारदारास लाच देण्यासाठी प्रवृत्त केले तर आरोपी लेखापाल राहुल विष्णू जाधव याने मुख्याध्यापकाच्या सांगण्यावरून तक्रारदाराकडून दहा हजाराची लाच स्वीकारली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चारही आरोपींना रं अटक केली.



दरम्यान,  काल सायंकाळी साडे सहाच्या सुमारास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे सदर कारवाई करण्यात आली आहे मुख्याध्यापक प्रल्हाद धोंडू गायकवाड, वस्तीगृह कार्यवाहक गजानन सुखदेव मोरे, मजूर जितेंद्र प्रल्हाद हिवाळे आणि लेखापाल राहुल विष्णू जाधव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies