Type Here to Get Search Results !

कॉलेजमध्ये कोणी तुम्हाला प्रपोज केलंय का?: भाजप नेत्या पंकजा मुंडेनी दिले दिलखुलासपणे उत्तर!



मुंबई: भाजप नेत्या पंकजा मुंडे या झी मराठीवरील बस बाई बस या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमादरम्यान, त्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे दिली. यावेळी त्यांनी तुम्हाला कोणी प्रपोज केलंय का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी दिलखुलासपणे उत्तरही दिले.



“मी जेव्हा कॉलेजमध्ये शिकत होते, तेव्हा गोपीनाथ मुंडे हे गृहमंत्री होते. त्यामुळे मला भरपूर सिक्युरिटी असायची. म्हणून लोक माझ्याशी बोलायला घाबरायचे. तसेच, यावेळी त्यांना तुम्हाला कोणी प्रपोज केलंय का? असा प्रश्नही विचारण्यात आला. त्यावर त्यांनी  आपल्याला कोणी प्रपोजच केले नाही, सुखद अनुभव आपल्याला मिळाला नाही, असे उत्तर दिले.



तसेच  “कायम बेरजेचं राजकारण करायचं, वजाबाकीचं नाही, असं बाबा सांगायचे. त्यामुळे इतर पक्षांत चांगलं काम करणाऱ्या लोकांना मी फोडलंय,” अशी पंकज मुंडे यांनी वक्तव्य केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies