Type Here to Get Search Results !

“घरात बायको जेवढी फुगत नसेल तेवढे हे मंत्री फुगत आहेत”: ‘यांची’ शिंदे गटावर टीका!



मुंबई:  आता  मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटपावरून विरोधकांनी निशाणा साधायला सुरुवात केली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. घरात बायको जेवढी रुसून बसत नसेल, तेवढे हे मंत्री रुसतायत, असा खोचक टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. 



अडीच वर्षात आमची सत्ता गेली. पुढील अडीच वर्षानंतर निवडणुका लागतील. मात्र सध्या शिंदे-भाजप यांच्या संयुक्त सरकारमधील मंत्र्यांमध्ये रुसवे-फुगवे आहेत. घरात बायको जेवढी फुगत नसेल तेवढे हे मंत्री फुगत आहेत, असा टोला सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटाला लगावला आहे. 



दरम्यान, एकनाथ शिंदे आणि भाजपा यांच्या संयुक्त सरकाचा मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप झाले आहे. यामध्ये महत्त्वाची खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आली आहेत. मोठ्या प्रतिक्षेनंतर राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला असली तरी कमी महत्त्वाची खाती मिळाल्यामुळे अनेक मंत्री नाराज असल्याचे म्हटले जात आहे. हाच धागा पकडत सुप्रिया सुळे यांनी मिश्किल टप्पणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलत होत्या. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies