Type Here to Get Search Results !

“उद्धव ठाकरे भाजप आणि जनतेशी गद्दारी करत मुख्यमंत्री बनले”!



मुंबई :  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत तसेच, आदित्य ठाकरे हेदेखील राज्यभर दौरे करत आहेत. अशातच आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. 



राणे म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे सारख्या कडवट शिवसैनिकाशी गद्दारी केली. पक्षातील आमदारांना कधीच सहकार्य केले नाही. जे काम केले ते फक्त नातेवाईक आणि मोतश्रीसाठी केले. तसेच,  भाजप आणि जनतेशी गद्दारी करत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले, असेही राणे यांनी वक्तव्य केले. 


दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी अनेकदा शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांचा गद्दार असा उल्लेख केला. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies