Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, शनिवार २० ऑगस्ट २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!मेष:

गणपतीाची उपासना करा. आज दिवसभर कार्यरत राहाल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव दिसून येईल.  बोलण्यात मधाळपणा बाळगावा. कामासंबंधी मनात संभ्रम बाळगू नका. वृषभ:

सहकार्यांची मदत घ्याल. गोड बोलून सर्व कामे निभावून न्याल. चमचमीत पदार्थांचा आस्वाद घ्याल. कौटुंबिक वातावरण आनंदी व उत्साही राहील. चांगली पुस्तके वाचनात येतील. 


मिथुन:

मैत्रीतील सलोखा कायम ठेवावा. वरिष्ठांची मनधरणी करावी लागू शकते. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करावा. नवीन योजनांची अंमलबजावणी करावी. जोडीदारावर विश्वास ठेवावा. 


कर्क:

जोडीदाराचे सहकार्य मिळेल. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक करा. दिवस अनुकूल जाईल. समोरील व्यक्तीशी वाद टाळावा. अतिगोड पदार्थ खाणे टाळावे. 


सिंह:

बौद्धिक चातुर्य दर्शवाल. विरोधकांचा त्रास कमी होईल. हलका आहार घ्यावा. आध्यात्मिक प्रगती करता येईल. वरिष्ठांना विश्वासात घेऊन कार्य तडीस न्यावे.


कन्या:

मनासारखे कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. मित्रांची मदत होईल. लहान-सहान दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. मनात उगाच नसत्या शंका आणू नका. नातेवाईकांचा रूसवा काढावा लागेल. 


तूळ:

मौजमजेवर पैसे खर्च होतील. समाधानी दिवस असेल. नवीन प्रकल्पावर काम चालू कराल. नवीन कामात समाधानी राहाल. नातेवाईकांच्या गाठीभेटी घडतील. 


वृश्चिक:

कामानिमित्त घराबाहेर राहावे लागू शकते. समोरील संधीचे सोने करावे.आळस झटकून कामाला लागावे. दीर्घ प्रतीक्षेच्या कामात यश येईल. आर्थिक पातळीवर समाधान मिळेल. 


धनू:

पारंपरिक विचार बाजूला सारून पहावेत.  हातून सेवा घडेल. नातेवाईकांना मदत करावी लागू शकते. घरगुती कामे जलद गतीने पार पडतील. जुन्या गोष्टीवर चर्चा टाळावी. 


मकर:

कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल. मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवा. दिवसभर कामात व्यग्र राहाल. चिकाटीने व प्रामाणिकपणे कामे कराल.  घरातील जुन्या गोष्टीवर चर्चा करू नका. 


कुंभ:

नवीन विचारांना चालना द्यावी. काही गोष्टी अधिकार वाणीने सांगाव्यात. मित्र जपून ठेवावेत. नवीन ओळखी सत्कारणी लागतील. भागीदारीत खुश असाल. 


मीन:

व्यापारी वर्गाला अपेक्षित लाभ होईल. कौटुंबिक शांतता बाळगावी. व्यवसाय वृद्धीचा विचार कराल.बोलताना सौम्य शब्दांचा वापर करावा. व्यायामाचे फायदे लक्षात घ्या. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies