Type Here to Get Search Results !

'येथे' १० मुलांना जन्म देणाऱ्या महिलांच्या खात्यात१३ लाख रुपये जमा करण्यात येणार!



नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन हे रशियाची लोकसंख्या वाढवण्यासाठी नवनवीन योजनांच्या घोषणा करत असतात. आताही पुतिन यांनी महिलांनी जर दहा मुलांना जन्म दिला आणि त्यांचे पालनपोषण केले, तर त्यांना रशियाची 'मदर हिरोईन' अशी उपमा दिली जाईल, अशी घोषणा पुतिन यांनी केली आहे. तसेच, महिलांना तेरा लाख रुपयांचं बक्षिस देऊन सन्मानित केले जाईल, असेही पुतिन यांनी जाहीर केले. व्लादिमीर पुतिन यांनी ही घोषणा १५ ऑगस्टला केली होती.



तसेच, महिलांना दहावं मुलं झाल्यावर एक वर्षाचा कालावधी संपल्यावर त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत. १३ लाख रुपये थेट महिलांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. एखाद्या मुलाचा अपघातात दुर्देवी मृत्यू झाला किंवा आकस्मिक मृत्यू झाल्यावरही महिलांना संपूर्ण तेरा लाखांची रक्कम अदा करण्यात येणार आहे.



दरम्यान, रशियाची लोकसंख्या गेल्या काही दशकांपासून कमी होताना दिसत आहे. २०२२ नंतर लोकसंख्येचे प्रमाण कमी होऊन १४५.१ मिलियन एवढी झाली आहे. २००० नंतर पुतिन राष्ट्रपती झाल्यानंतर अनेकदा लोकसंख्येच्या समेस्येवर लक्ष वेधले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies