Type Here to Get Search Results !

प्रेमप्रकरणातून विवाहित तरुणाने डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या!



पुणे : पुण्यातील हडपसर परिसरात २६ वर्षीय तरुणाने प्रेम प्रकरणातून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. विशाल राजेंद्र तोडकर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद कऱण्यात आली आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, विशाल हा कपड्याच्या व्यासायिक होता.पुणे शहरात त्याची कपड्याची दुकाने आहेत. डिसेंबर २०२१ मध्ये त्याचे लग्न झाले होते. सध्या तो हडपसर परिसरात पत्नी आणि आईसोबत राहत होता. विशालचे एका तरुणी सोबत प्रेमसंबंध होते.याच कारणावरून मागील काही दिवसांपासून त्याच्या घरात वाद-विवाद होत होते. यामुळे पत्नीही माहेरी निघून गेली होती. पत्नी माहेरी गेल्यामुळे तो मागील काही दिवसांपासून नैराशात होता. दरम्यान, रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्याने स्वतःवर पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली. कुटुंबीयांनी विशालला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर कुटुंबीयांना घडलेल्या प्रकाराबाबत सर्व माहिती समोर आली.



दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. विशालच्या मृत्यूला जबाबदार त्याची प्रेयसी आहे, असा आरोप करत विशालच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies