Type Here to Get Search Results !

“महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिले दाढीवाले मुख्यमंत्री”; ‘यांची’ दाढीवरून मुख्यमंत्री शिंदेवर टोलेबाजी!




नागपूर :राज्यात सध्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सभागृहात संघर्षाच्या ठिणग्या उडतानाही दिसत आहेत. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी केलेल्या टोलेबाजी करत  त्यांच्या थेट मुख्यमंत्र्यांच्या दाढीलाच हात घातला.



भुजबळ म्हणाले की, 'समोर मुख्यमंत्री बसलेले आहेत, मला त्यांच्याकडे बघून खूप आनंद झाला आहे. माझा आनंद वेगळाच आहे. कारण महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिले दाढीवाले मुख्यमंत्री झाले', सफेद दाढी आणि काळ्या दाढीत फरक आहे. काळ्या दाढीचा प्रभाव फक्त महाराष्ट्रात आहे. सफेद दाढीचा प्रभाव दिल्लीपासून भारतभर आहे', असे वक्तव्य त्यांनी केले.



दरम्यान, भुजबळांनी मुख्यमंत्र्यांच्या दाढीसंदर्भात टोलेबाजी करताच सभागृहातील इतर सदस्यांनी त्याला हसून दाद दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies